भंडारा न्यूज़
भंडारा शहराचा जीव गुदमरतोय… ऐकून धक्का बसला न पण हे खरे आहे।भंडारा शहरात “भाऊ”गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून चौकाचौकात शुभेच्छा फलकांचा भडिमार केल्याने शहराचे विद्रुपिकरण सुरु झाले आहे।आपल्या मोठेपणा मिरविण्यासाठी गल्लीतिल मिसुरडेही न फुटलेली पोर स्वत:ला भाई अन भाऊ म्हणून घेत लोकांच्या उरावर उगिच शुभेच्छा अभिनंदन व स्वागताचा भडिमार करीत असल्याचे चीत्र उभे आहे।यात तुमचा शौक असला तरी आमचा जीव गुदमरतोय असा आवाज भंडारा शहरातून चौकाचौकातुन येत आहे।
कोरोना मुळे गेल्या दोन वर्षापासून अनेकांना सार्वजनिकरित्या फ्लैक्स ,बैनर झळकता आले नव्हते।यंदा मात्र सर्वांची नामी संधी साधुन घेतली आहे।जिल्हा परिषद,पंचायत समिति, नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्व गल्ली बोल्यातिल नेत्यांचे प्रेम उफालून आले आहे।त्यांमुळे ताई,दादा, अक्का भाऊ, साहेब,पाटिल राव-साव सारे एकजात झाडून सक्रिय झाले आहे।गणेशोत्सव पासुन सुरु झालेल्या हा प्रकार दीपाली व नववर्षापर्यत्न राहनार आहे।त्यांमुळे भंडारा शहरातील कलेक्टर चौक,जिल्हा परिषद चौक,मोठा बाजार, लाल बहादुर शास्त्री चौक, गांधी चौक फलक लोबंकाळत दिसत आहे।ह्या फलका मुळे वाहतुकीला व्यस्तय येत असून मोठ्या अपघातास निमंत्रक ठरत आहे।आता ह्या प्रकरणी भंडाराकऱ्यांनी कंबर कसली असुन नगर परिषदेद्वारे कारवाई ची मागणी केलि जात आहे।
विशेष म्हणजे नगर परिषद भंडारा यांचे शहरात अधिकृत होर्डिंग असून त्यांच्या कर नगर परिषदेला नियमित मिळत असतो।मात्र बाकी सर्व बर्थडे, स्वागत,अभिनंदन फ्लैक्स ,बैनर हे अनधिकृत असून त्यांची कुठलीही परवानगी नगर परिषद भंडारा यांनी दिली नाही।त्यांमुळे अश्या अनधिकृत पोस्टर फ्लैक्स ,बैनर वर आता नगर परिषद प्रसाशन कारवाई च्या बड़गा उगारनार आहे।
शहरात प्रत्येक वर्षी तिच परिस्थिती पहायला मिळत असून आता तरि खऱ्या अर्थाने नगर परिषद प्रशासनाला कठोर पावले उचलन्याची गरज आहे।
