Crime 24 Tass

ड्रग्जचा खेळ सुरु होण्यापूर्वीच मोडला, मुंबई विमानतळावर 20 कोटींचं हेरॉईन जप्त; 2 महिलांना अटक

मुंबई: महाराष्ट्रात कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचं प्रकरण चर्चेत असताना गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जविरोधातील विविध विभागांची कारवाई जोरात सुरु असल्याचं चित्र आहे.
मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं तब्बल 20 कोटी रुपयांचं 4 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक देखील करण्यात आली आहे.
20 कोटीचं हेरॉईन जप्त
कस्टम विभागानं छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विमानतळावर संबंधित महिलांकडे 20 कोटी रुपयांचं 4 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचा पासपोर्ट आढळून आला आहे.
दुबईवरुन मुंबईत आल्याची माहिती
कस्टम्स विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर 20 कोटी किंमतीचे 4 किलो हेरॉइन ड्रग्ज जप्त केलं आहे. ज्या महिलांकडे ड्रग्ज आढळून आलं त्यांच्याकडे युगांडाचा पासपोर्ट आढळला आहे.
अटक केलेल्या महिलांची नावं क्यांगेरा फातुमा आणि तिची मुलगी मान्सिम्बे जयानाह अशी आहेत. त्यांनी जुबा ( सूडान ) ते दुबई आणि दुबई वरुन मुंबई असा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयीन कोठडी
कस्टम विभागानं मुंबई विमानतळावर या महिलांना अटक केल्यांनतर न्यायालयात हजर केले. न्यायालयानं या आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रग्ज विरोधात कारवाई सुरुच
एकीकडे राज्यभरात अंमली पदार्थांवरून वातावरण तापलेलं असताना अंबरनाथमध्ये पोलिसांनी गांजा विकणाऱ्या एका महिलेला दोन दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा भागात ही कारवाई करण्यात आली होती. अरुणा जाधव असं या गांजा विक्री करणाऱ्या महिलेचं नाव असून तिची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आहे. मात्र ही महिला गांजा विकत असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून अरुणा जाधव या महिलेला अमली पदार्थांसह ताब्यात घेतलं. तिच्याकडून विक्रीसाठी बाळगलेला 5 किलो 135 ग्राम गांजा जप्त करण्यात आला होता.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]