भंडारा जिल्ह्याच्या तुमसर – रामटेक मार्गावर अपघात झाला असून यात 15 महिला मजूर जखमी झाल्या आहेत. मोहाडी तालुक्यातील पिटेसुर गावातील महिला मजूर ह्या चारचाकी गाडीने हीवरा वासेरा गावाकडे शेत मजुरी करिता जात असताना चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
साध्या स्थितीत ग्रामीण क्षेत्रात शेती कार्य सुरू असून धान कापणी करिता महिला मजूर अन्यत्र जातात परंतु गेल्या 21 दिवसा पासुन एस.टी बसेस च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने या महिला मजुरांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. असेच मोहाडी तालुक्यातील पिटेसुर गावातील 20 महिला मजूर या हिवरा वासेरा या गावाकडे निघाल्या. या दरम्यान हिवरा गावाबाहेरील एका वळणार वहां चालकाचे नियंत्रण सुटले अणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पालटली. यात 15 महिला मजुर गंभीर ज़ख्मी झाल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयात तुमसर, मोहाडी येथे उपचार करिता पाठविण्यात आले. यातील अधिक गंभिर जखमी महिलांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
