Crime 24 Tass

आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न भंडारा ठाण्यातील घटना : पोलीस प्रशासनात उडाली खळबळ

भंडारा : पोलिस कोठडीत असलेल्या एका आरोपीने कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना भंडारा पोलीस ठाण्यात रविवारला रात्री घडली. या घटनेने पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
भिस्सी उर्फ विशाल देवेंद्रसिंग तोमर (२७) रा. काजी नगर, कस्तुरबा वाट भंडारा असे पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. १८ नोव्हेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालय समोर प्रेमसिंग नरोडीया याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशाल तोमर हा भंडारा पोलिसांच्या कोठडीत आहे. रविवारला कोठडीत असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरजोराने ओरडला.
त्यावेळी कर्तव्या वरील पोलीस कर्मचाऱ्याने त्याला त्याबाबत विचारणा केली असता मला माझ्या वडिलांना आत्ताच भेटायचे आहे, असे म्हणत कोठडीतील भिंतीवर जोरजोराने डोके आपटू लागला. यात कपाळाला मार लागल्याने रक्त वाहू लागले. त्यामुळे कर्तव्यावरील पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना देत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनंदा खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे हे करीत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]