Crime 24 Tass

भंडारा एस टी विभागाला तब्बल 12 कोटी च्या फटका…भंडारा एस टी विभागात एकूण 91 कर्मचारी झाले निलंबित…तर 56 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त..

गत चोवीस दिवसापासून एसटीचा संप सुरू असून संप मागे घेण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने आता शासनाने कडक धोरण अवलंबित करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित तर काही कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ति चे करण्याचे आदेश दिले आहे।त्यानुसार भंडारा विभागातील सुरुवातीला 91 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते,असून 56 रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्यात आली आहे।भंडारा जिल्ह्यात 29 ऑक्टोंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे।दिवाळीच्या पर्वावर भंडारा विभागातिल 6 ही आगाराचे कर्मचारी संपावर गेले आहेत।भंडारा विभागात 1835 कर्मचारी असून 1500 कर्मचारी संपावर गेले आहे।त्यामुळे 367 बसेस द्वारे दररोज होणाऱ्या 2 हजार 652 फेऱ्या रद्द झाल्या आहे।त्यामुळे एसटीला मोठा 12 कोटी रूपयाच्या आर्थिक फटका बसत आहे। वरिष्ठ पातळीवर बोलणी होऊनही कर्मचाऱ्यांचा संप मागे न घेतल्याने आता शासनाने कडक धोरण अवलंबत असल्याचे सांगण्यात येत आहे।

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]