मेडीकल मधून औषध घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घुग्घुस पोलीसांनी वणी येथील आरोपी राजेश समय्या सब्बनवर ( 56) याला अटक केली आहे.
औषध घेण्यासाठी घुग्घुस येथिल अल्पवयीन मुलगी मेडीकल मध्ये गेली होती. औषध घेऊन ती निघाली असता आरोपी राजेश सब्बनवार याने तिला घरी सोडण्याच्या बहाण्यने गाडीवर बसवले.
मात्र आरोपीने चंद्रपूर रस्त्यावरील अंतुर्ली फाट्यावर वाहन थांबविले अन तिच्यावर अत्याचार केला. ती विनवनी करीत होती मात्र वासनेने आंधळा झालेल्या आरोपीनी तिच्यावर बळजबरी केली. या प्रकाराची तक्रार अल्पवयीन मुलीने घुग्घुस पोलीस स्थानकात केली. पोलिसांनी तक्रारीवरून राजेश समय्या सब्बनवारला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे करीत आहेत.
