Crime 24 Tass

१०५ नगर पंचायती आणि महापालिकेची पोटनिवडणूक २१ डिसेंबरला

मुंबई : मुंबई, धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्त पदांसाठी तसेच १०५ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.
धुळे- ५ब, अहमदनगर- ९क, नांदेड वाघाळा- १३अ आणि सांगली मिरज कुपवाड- १६अ. या चार प्रभागांत पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात राहील. यासाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबपर्यंत असेल. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी होईल.
अशाच प्रकारे राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर, पालघर जिल्ह्यात तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड जिल्हय़ात खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, सिंधुदुर्गमधील कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे जिल्ह्यात देहू (नवनिर्मित), सातारामध्ये लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर जिल्ह्यात माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिकमध्ये निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा या नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळय़ा-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, िहगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,
अमरावती- भातकुली, तिवसा, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, नागपूर- िहगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड येथेही निवडणूक होत आहे. याशिवाय विविध जिल्ह्यांतील सात नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर रोजी तर मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी होईल

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]