Crime 24 Tass

वाळूची तस्करी करणान्या टिप्परने कोतवालाला पळविले बनावट रॉयल्टीचे प्रकरण उघडकीस : वरठी पोलिसात गुन्हा दाखल

भंडारा : खऱ्या रॉयल्टीसारखी हुबेहूब बनावट रॉयल्टी तयार करून त्या माध्यमातून वाळूची तस्करी करण्यात येत होती . या गंभीर प्रकरणी तुमसरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी टिप्परवर कारवाई केली . मात्र , टिप्पर चालक आणि मालकाने कोतवालासह टिप्पर पळवून ‘ नेल्याची घटना घडली यामुळे महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली . गौरीशंकर सुधाकर शेंडे ( चालक ) आणि उमेश उमरावजी सिंगनजुडे ( मालक ) दोघेही रा . खरबी ता तुमसर यांच्या विरोधात वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या मागे एकलारी बीड सितेपार मार्गावर मंगळवारी रात्री घडला . तुमसरचे उपविभागीय अधिकारी बी . डी . टेळे हे आपल्या महसूल पथकासह गस्तीवर होते . यावेळी त्यांना काळ्या पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा एमएच वाय ९ ७५१ हा टिप्पर सनफ्लॅग कंपनीच्या मागील मार्गावर आढळून आला . महसूल पथकाने सदर टिप्पर थांबून त्यात असलेल्या वाळूच्या रॉयल्टीबाबत चौकशी केली . यावेळी टिप्परचा चालक गौरीशंकर शेंडे व मालक उमेश सिंगनजुडे यांनी त्यांच्याजवळ असलेली रॉयल्टी महसूल पथकाला दाखविली . ताब्यात घेतलेल्या टिप्परमध्ये वरठीचे कोतवाल कमलेश पाटील यांना बसवून सदर टिप्पर वरठी पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी नेण्यात येत होते . मात्र , कारवाईच्या धास्तीने टिप्पर चालक शेंडे आणि मालक सिंगनजुडे यांनी कोतवालासह वाळू भरलेले टिप्पर पळवून नेले .
दरम्यान , टिप्परमध्ये असलेले कोतवाल शेंडे यांना दोघांनीही धमकी दिली . त्यानंतर कोतवाल शेंडे यांना मार्गावरील खात या गावाजवळ उतरवून वाळू भरलेल्या टिप्परसह तेथून पोबारा केला . याप्रकरणी कोतवाल पाटील यांच्या तक्रारीवरून वरठी पोलिसात टिप्पर चालक गौरीशंकर शेंडे व मालक उमेश सिंगनजूळे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सलामे करीत आहे . बनावट
रॉयल्टीवर वाळूचा गोरखधंदा : तपासणीदरम्यान रॉयल्टी ही खऱ्या रॉयल्टीसारखी हुबेहूब तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले . बनावट रॉयल्टी तयार करून वाळूची तस्करी करून महसूल प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर बाब उपविभागीय अधिकारी टेळे यांच्या निदर्शनात आले . बनावट रॉयल्टीच्या आधारावर वाळू तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने टिप्परचा पंचनामा करण्यात आला . यावेळी टिप्परमध्ये ७२ हजार ४०० रुपयांची ४ ब्रास वाळू आढळून आली . याप्रकरणी टिप्पा पंचनामा करून सदर टिप्पर महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले .

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]