Crime 24 Tass

लाचखोर पशुधन पर्यवेक्षक सव्वालाखे एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया:शासनाच्या मराठवाडा पॅकेज योजनेअंतर्गत अनुदान रक्कमेचा दुसरा हप्ता देण्याकरिता लाच मागणार्‍या गोंदिया पंचायत समितीच्या पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 8 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
संजय प्रेमलाल सव्वालाखे (50) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे.
तक्रारदार हे शेतकरी असून महाराष्ट्र शासनाच्या मराठवाडा पॅकेज योजना अंतर्गत शेळी गट वाटप योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरीता त्यांनी पंचायत समितीत अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना शेळी गट मंजूर झाले. योजने अंतर्गत 20 + 2 ( शेळी + बोकड ) गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी केले. त्यानंतर गोंदिया पंचायत समिती विभागाकडून लाभार्थी शेतकर्‍याला पहिल्या टप्यातील 57,350 रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यानंतर तक्रारदाराने दुसर्‍या टप्प्यातील अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन सव्वालाखे याला विचारणा केली. यावेळी सव्वालाखे याने अनुदानाची रक्कम देण्याकरिता लाभार्थी शेतकर्‍याला दहा हजार रुपयांची लाच मागितली.
परंतु तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या पडताळणीनंतर आज गुरुवार, 25 नोव्हेंबर रोजी सापळा कारवाई करण्यात आली. तडजोडीनंतर सव्वालाखे यांना 8 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना गंगाझरी येथील बसस्थानक चौकात रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी संजय सव्वालाखे यांच्या विरोधात गंगाझरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सफौ विजय खोब्रागडे, पोहवा राजेश शेंद्रे, नापोशि योगेश उईके, रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले यांनी केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]