Crime 24 Tass

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारची नवी योजना, असा होणार फायदा, वाचा..

ओबीसी (इतर मागासवर्ग प्रवर्ग) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच हे शिक्षण घेताना त्यांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ सुरू केली जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून, दरवर्षी ४०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.. या योजनेसाठी दरवर्षी ६ कोटी रूपयांची तरतूद केली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले..
राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख रुपये, तर उच्च अभ्यासक्रमासाठी 20 लाख रुपये कर्जमर्यादा असणार आहे.
राज्यांतर्गत अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असेल.. देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacqarelli Symonds) च्या रँक्रिग तसेच गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE) Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात..
बँकेकडून वितरीत केलेल्या रकमेवर जास्तीत जास्त १२ टक्के रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना करेल. लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटी व शर्ती, कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे, कार्यपद्धतीबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]