Crime 24 Tass

कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजारांची मदत; असा करा मदतीसाठी अर्ज

राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे लाखो लोकी बाधित झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांसमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबाच्या मदतीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा काल ट्विट करीत केली. राज्य सरकारची हि मदत मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेनंतर आलेली दुसरी लाट अत्यंत भयंकर होती. मात्र आता हळूहळू दुसरी लाट ओसरली आहे. तर तिसर्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारची मदत देण्यासाठी काही विशिष्ट निकष राज्य सरकारने ठेवले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या संबंधित व्यक्तींच्या कुटुंबियांना स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन तसेच सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यांना मिळू शकणार आर्थिक मदत –
1) ज्या रुग्णांचे अहवाल हे RT-PCR/MolecularTests/RAT या चाचण्यामधून positive आलेले आहेत. अशा रुग्णांचे नातेवाईक आंतररूग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-19 असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-19 मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजले जाणार आहे.
2) कोव्हिड-19 प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू करण्यात आलेल्या चाचण्यांच्या तारखेपासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत होणे अपेक्षित आहार. तसे असेल तरच अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड 19 चा मृत्यू समजण्यात येणार आहे.
3) सभनधीत कोरोना झालेल्या रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तिचा कोव्हिड-19 चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तर त्यांना मदत दिली जाणार आहे.
4) कोव्हिड-19 चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसांच्यानंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड-19 चा मृत्यू समजण्यात येईल. 
वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा?
राज्य सरकारच्यावतीने दिली जाणारी मदत मिळवण्यासाठी कहाणी विशिष्ट पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची माहिती आणि कार्यपद्धतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील. आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी कोव्हिड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसीत केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
मदतीसाठी ‘हि’ लागणार महत्वाची कागदपत्रे –
1) कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील
2) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र
3) मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईक जे अर्ज करणार आहे त्यांचा स्वत:चा तपशील
4) अर्जदाराचे स्वताचे आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
5) अर्जदाराचे बॅंकेत असलेले बेक पासबुक अथवा बँकेला तपशील
6) मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]