Crime 24 Tass

पक्ष हितापुढे गटतट न आणता एकजुटीने काम करा.खा.सुनील मेंढे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भंडारा:
21 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी मोहाडी येथे डेकाटे फार्म हाऊस वर महत्वपूर्ण बैठक घेतली. पक्षाचे चिन्ह हाच आपला उमेदवार असे समजून एकत्रितपणे त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी खासदारांनी केले.


जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती च्या निवडणूक प्रमुख पदी खासदार सुनील मेंढे हे आहेत. कालच जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख स्पष्ट झाली. 21 डिसेंबर रोजी ही निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर मोहाडी येथे ही बैठक झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिऱ्हेपूंजे, जिल्हा महामंत्री हिरालालजी रोडगे, शांतारामजी चाफले, तालुका अध्यक्ष हंसराजजी आगाशे, बाबूभाऊ ठवकर, शहर अध्यक्ष यादोराव कुंभारे, महिला शहर अध्यक्ष सौ.निशाताई पशीने, दिनेश निमकर, रविकांत देशमुख, सेवक चिंधालोरे, तसेच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने समोरील आपला उमेदवार निश्चित करावा. गटातटाचे राजकारण विसरून पक्ष हित लक्षात घेता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असावेत अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.

 कार्यकर्त्यांनी नगर वासियांना राज्य शासनाचे अभ्यास आणि केंद्र शासनाने राबवलेल्या लोककल्याणाच्या योजना यांची जाणीव करून द्यावी असेही खासदारांनी सांगितले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]