Crime 24 Tass

शिकारीसाठी पसरविलेल्या वीज प्रवाहित तारांच्या स्पर्शाने मुलाचा मृत्यु…

वडील गंभीर जखमी…दिघोरी – सालेबर्डी शेतशिवारतील घटना…गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी…
 रात्रीच्या सुमारास जंगल परिसरातील शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञातांनी पसरविल्या विज प्रवाहित तारांचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत मुलाचा मृत्यू तर वडील गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातिल सालबर्डी जंगलपरीसरात घडली आहे।या दुर्घघटनेत दिघोरी मोठी येथील श्रीकांत मनोहर कापसे वय 22 वर्ष असे मृत मुलाचे नाव असून मनोहर कापसे वय 50 वर्ष असे गंभीररित्या जखमी वडीलाचे नाव आहे।
रात्रीच्या सुमारास घटनेतील पिता-पुत्र मालकी शेतावर पेरणी केलेल्या रब्बी पिकांना सिंचन करण्याकरिता जात असताना सालेबर्डी येथील मुलचंद मेश्राम यांच्या शेतात अज्ञात शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जमिनीवर जिवंत विद्युत तारा पासरविल्या होत्या।
सदर घटनेची माहिती नसलेले घटनेतील पिता – पुञ राञीच्या सुमारास मालकी शेतात पेरणी केलेल्या रब्बी पिकांना सिंचन करण्यासाठी गेले असता वाटेत मुलाच्या पायाला विजप्रवाहित तारांचा स्पर्श होऊन विद्युत धक्क्याने बेशुद्ध झाला।यावेळी मुलाच्या बचावासाठी धावलेल्या वडिलांच्या दोन्ही पायांना देखील विजप्रवाहित तारांचा स्पर्श होऊन गंभीररीत्या जखमी झाले।
यावेळी गंंभीर जखमी अवस्थेतील वडीलांना बेशुद्ध अवस्थेतील पुञाचे मृत्यु झाल्याचे समजुन घाबरलेल्या स्थितीत गावात येऊन गावकऱ्यांसह कुटुंबियांना घटनेची माहिती दिली। दरम्यान गावकऱ्यांनी जखमी अवस्थेतील वडिलांना ऊपचारासाठी दिघोरी मोठी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात भरती करुन घटनास्थळाकडे धाव घेतली।या घटनेची माहिती स्थानिक दिघोरी पोलीसांना होताच सबंधितांनी घटनास्थळी जाऊन बेशुद्ध अवस्थेतील मुलाला ऊपचारार्थ दिघोरी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात भरती केले माञ मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने सबंधिताला पुढील ऊपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यु झाला आहे।
गत काही दिवसांपुर्वी तालुक्यातील मुर्झा – झरी जंगल परीसरात विजप्रवाहीत तारा लाऊन निलगायीच्या शिकारीची घटना घडली होती। सदर घटनेत वन विभागाने दोन आरोपींना अटक करुन तुरुंगात धाडले असतांना तालुक्यातील दिघोरी – सालेबर्डी शेतशिवारातील शिकारीसाठी पसरविण्यात आलेल्या विजप्रवाहीत तारांच्या स्पर्शाने मुलाचा मृत्यु तर वडिल गंभीर जखमी झाल्याने सर्वञ संताप व्यक्त केला जात आहे।दिघोरी मोठी परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून या जंगल व्याप्त भागात अनेक जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असतो मात्र वनविभागाची शिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने लहानलहान गावात शिकारी तयार झाल्याचे पहावयास मिळत आहे ।
सदर घटनेत नाहक एका तरुणाचा जीव गेला असून संपुर्ण परिवार मुलाविना पोरका झाला आहे।त्यामुळे यापुढे आशा घटना घडू नये यासाठी शिकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई ची मागणी होत आहे।याप्रकरणी स्थानिक दिघोरी पोलीसांनी घटनेची नोंद करुन अज्ञात शिकाऱ्यांविरोधात तपासकार्य आरंभीले आहे।

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]