खड्यामुळे उसाने भरलेली ट्राली पलटल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तुमसर मार्गावरील चांदोरीजवळ घडली आहे।विशेष म्हणजे हा अपघात खड्ड्यामुळे झाला आहे।यात सुदैवाने जीवतहानी झाली नाही, तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे।ह्या मार्गावर खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत।
ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडले असल्यामुळे खड्ड्यांमधून मार्ग काढणे कठीण जाते।विशेष खड्ड्यावरुण गाड़ी गेल्याने संतुलन बिघडल्यास उलटण्याच्या घटना या रस्त्यावर वारंवार घडत असल्याचे नागरिक सांगत आहे।
