गांजाची वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी गाडीला भंडारा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले असून ह्या या कारवाईत किमान 632 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे।ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेने रात्रगस्त दरम्यान पहाटे मुजबी गावाजवळ घडली असून 68 लाख 49 हज़ार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।
ओडिसा येथे मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जाते, ओडीसा येथून बोलोरो पिअकप गाडी (क्रमांक ओडी 05 ए डब्लू 9092 ही) भंडारा मार्गे नागपूरकडे निघाली होती। दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आपल्या पथकासह रात्रिला गस्तीवर होते।पहाटेच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेचे पथक बेला गावाजवळ असताना ही बोलोरो पिकअप गाडी संशयास्पद स्थितीत भरधाव गेली।गाडीबाबत संशय आल्याने त्यांनी वाहन चालकाला बोलोरो पिअकप गाडीचा पाठलाग करण्याचे निर्देश दिले।
मुजबी गावाजवळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या गाडीने गांजा तस्करी करणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून थांबविले असता तस्कर तिथून फरार झाले। वाहनाची तपासणी केली असतात त्यात गांजा असल्याची बाब लक्षात आली।या वाहनात सुमारे 17 बोऱ्यांमध्ये जवळपास 632 किलो गांजा मिळाला असून 68 लाख 49 हज़ार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।याप्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे।
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी वाहनाची तपासणी केली असतात त्यात गांजा असल्याची बाब लक्षात आली. याची माहिती त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना दिली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण सुभाष बारसे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन भंडारा पोलीस स्टेशन येथे आणले
