Crime 24 Tass

जुनी पेन्शन साठी आता आर-पारची लढाई : राज्याध्यक्ष शिवराम घोती

भंडारा येथे डिसीपीएस/एनपीएस धारकांची जिल्हास्तरीय सभा संपन्न
“पेन्शन योजना ही सामाजिक सुरक्षिततेची हमी देणारी असावी. पण 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने आधी डिसीपीएस आणि नंतर एनपीएस योजना लागू केली. वास्तविक पाहता ही योजना फसवी असून आता आम्ही आर-पारच्या लढाईसाठी सज्ज आहोत. आता जुनी पेन्शन घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असे प्रतिपादन महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. शिवराम घोती सर यांनी केले. भंडारा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय डिसीपीएस/एनपीएस धारकांच्या सभेत ते बोलत होते. 
याप्रसंगी महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. नदीम खान यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष पदी तर जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे श्री. भूषण फसाटे यांची जिल्हा सचिव, जनता विद्यालय तुमसर येथील श्री. पंकज बोरकर यांची जिल्हा कोषाध्यक्ष तर मानवता पूर्व प्राथमिक विद्यालय भंडारा येथील सौ. कल्याणी निखाडे-तिरपुडे यांची महिला आघाडी प्रमुख पदी राज्याध्यक्ष श्री. घोती यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
पुढे बोलताना श्री. शिवराम घोती म्हणाले “जुनी पेन्शन सर्व एनपीएस धारकांना हवी आहे पण शासनाच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम व कायदे आहेत. सर्व विभागांनी एकत्र येऊन लढा दिल्यास एक दबाव गट तयार होईल व आपल्याला जुनी पेन्शन मिळेल. फक्त आंदोलने करून व शासनास वेठीस धरून आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यासाठी कायद्याचा आधार असावा लागतो.
आपण सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी आणि संदर्भासहित शासनाकडे मांडल्या आहेत आणि आम्ही सतत पाठपुरवठा करीत आहोत. आपली मागणी रास्त कशी आहे ते आपण शासनाला पटवून दिले आहे. सेवा उपदानाचा मुद्दा नुकताच आपण मार्गी लावला आहे. आता एकच मिशन आहे. ते म्हणजे जुनी पेन्शन घेतल्याशिवाय आपण आता थांबणार नाही,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. भंडारा जिल्हा एनपीएस धारकांच्या वतीने याप्रसंगी राज्याध्यक्ष श्री. शिवराम घोती यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी मंचावर राज्य कोषाध्यक्ष श्री. गजानन टांगले, राज्य सल्लागार श्री. तेजराम बांगडकर, नागपूर विभागीय अध्यक्ष श्री. यशवंत कातरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री. कोहिनूर वाघमारे,
जुनी पेन्शन संघर्ष समितिचे श्री. आर. बी. ठाकरे, उमरेड तालुका सचिव श्री. बी. आर. मेश्राम, नागपूर विभागीय प्रसिद्धी प्रमुख श्री. स्वप्नील गवळी, जुनी पेन्शनचे शिलेदार श्री. सचिन तिरपुडे व श्री. विनोद कींदर्ले उपस्थित होते. याप्रसंगी एनपीएस धारक सौ. रश्मि जोशी, सौ. नीलिमा लेपसे, श्री. संदीप बेदरकर यांनी आपले विचार मांडले. मार्गदर्शनानंतर झालेल्या चर्चासत्रात माननीय राज्याध्यक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले. सौ. स्नेहल पनके सार्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]