Crime 24 Tass

संशयास्पद स्थितीत युवतीचा मृतदेह आढळला पालांदुर चौरास येथील घटना

 घरून सामान घेण्याकरिता निघालेल्या युवतीचा मृतदेह पालांदुर कब्रस्थान परिसरात आढळल्याने खळबळ उडाली असुन मृतक युवतीचे नांव शिल्पा तेजराम फुल्लूके (वय 19) मरेगांव असे असुन मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु सापडल्याने युवतीची हत्या कि आत्महत्या अशा चर्चा होत असल्या तरी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचल्याने संशय बळावला आहे.

 


मृतक युवती संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी असुन उपवर असल्यामुळे तिला पाहण्यासाठी माहगांव ता. अर्जुनी/मोर येथील युवक येणार होता त्यामुळे सामान खरेदीच्या बहाण्याने (ता. 29) सकाळी 11 वाजता ती घरून निघाली त्यानंतर दुपारी तीन वाजता सुमारास तिचा पालांदुर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाजवळ निर्जन स्थळी, संदिग्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु तथा विषाची बाटली सापडल्याने मृत्यूचे गुढ वाढले आहे. पालांदुर पोलीसांनी घटनेची नोंद केली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली, उपविभागीय पोलिस अधीकारी रविंद्र वायकर घटना स्थळी असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती घटनास्थळावर भेट दिली.

 

असुन पालांदुर पोलीसांनी सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उतरीय परीक्षणाकरीता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले आहे. सदर घटना प्रेम प्रसंगातुन घडल्याच्या चर्चा होत आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार ओमप्रकाश केवट करीत असून या घटनेमुळे नाना त-हेचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]