Crime 24 Tass

सरपंच आणि उपसरपंच यांनी केली गावकऱ्यांस मारहाण घरकुल मिळाले नसल्याच्या वादातून झाली मारहाण

गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार या गावातील राहणार दुर्गेश उईके या तरुणास गावातील सरपंच किशोर ब्राह्मणकार उपसरपंच शैलेश मेश्राम, सरपंच यांचा मुलगा पवन ब्राम्हणकर आणि उपसरपंच यांचा साळा यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार घरकुल यादीत नाव न आल्या मुळे घडल्याचे संगणकात येते आहे.
बोरकन्हार या गावातील राहणार दुर्गेश उईके याने शासनाने कडून मिळणार्‍या घरकुल करिता ग्राम पंचायती मध्ये अर्ज सादर केले. या दरम्यान घरकुल बांधकाम यादी नाव आले नाही म्हणून दुर्गेश उईके यांनी सरपंच अणि उपसरपंच यांच्यावर यादीत घोळ केला असल्याचा आरोप लावला. या आरोपा वरुण गावातील चौकात दुर्गेश चा उपसरपंच शैलेश मेश्राम याच्या सोबत वाद झाला. या दरम्यान चौकात सरपंच ब्राह्मणकर ही पोहोचले अणि दोघांनी दुर्गेश ला मारहाण केली. यात उपसरपंच यांच्या सगळ्यानी सुद्धा दुर्गेश वर हात साफ केले. या मारहाणीत दुर्गेशचा पाय फ्रॅक्चर झाला.
दुर्गेश ला मारहाण करण्याऱ्यावर कारवाही करण्याची मागणी त्याच्या परिवाराकडून करण्यात येत आहे. मात्र सरपंच आणि उपसरपंच यांनी हे आरोप फेटाळत, सर्व आरोप बिनबुडाचे असून राजनैतिक द्वेष भावनेतून आरोप करण्यात आले असल्याचे मत सरपंच किशोर ब्राम्हणकर व उपसरपंच शैलेश मेश्राम यांनी व्यक्त केले. मात्र आता जनप्रतिनिधी द्वारा मारहाण झाली असल्याने आता पोलीस कोणती कारवाही करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुर्गेश उईके मारहाण झालेला युवक
घरकुल योजनेच्या यादीत नाव न आल्या मुळे मी सरपंचांना विचरना केली. यावर त्यांनी शिवीगाळ करीत मला मारहाण केली. पोलिसांनी कारवाई करावी.
शेवंताबाई उईके मारहाण झालेल्या युवकाची आई
आम्ही काहीही बोलले नसताना अणि केवळ घरकुल योजनेत नाव का आले नाही विचरना केली असता सरपंच अणि उपसरपंच यांनी माझ्या मुलाला मारहाण केली. त्यांच्या विरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी.
भोजराज ब्राम्हणकर सरपंच बोरकन्हार
दुर्गेश हा मद्य प्राशन करून गावच्या चौकात घरकुल यदि वरुण शिवीगाळ करीत असल्याचे मला कळाले. मी अणि उपसरपंच चौकात पोहोचून त्याची समजूत काढली अणि तंटा मुक्त समिति समोर हजर केले. त्याला मारहाण करण्यात आली नाही. विरोधकांनी त्याला दारू पाजून भडकावले आहे.
शैलेश मेश्राम उपसरपंच बोरकन्हार
दुर्गेश हा चौकात वाद घालत होता त्या मुळे मी सरपंचांना बोलावले अणि त्याची समजूत काढली. परंतु विरोधकांनी त्याला दारू पाजून भडकवून मारहाण केल्या गेल्याचे खोटी तक्रार केली आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]