Crime 24 Tass

Nagpur : एका पिंपळाच्या झाडासाठी एकवटले ‘नागपूरकर

नागपुरातील 208 वर्ष जुनं असलेलं पिंपळाचं झाड तोडू नये म्हणून सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झाड वाचविण्याची सामाजिक संघटना विनंती करत आहेत.
नागपुरातल्या सीताबर्डी भागात 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे. हे झाड तोडलं जावं म्हणून या जागेचे मालक आणि अर्जदार घनश्याम पुरोहित यांनी नागपूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज केला होता.
हे झाड दोनशे आठ वर्ष जुने असल्यामुळे तसेच कुठलीही मोठे झाड तोडायचे असल्यास वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात काढणे गरजेचे असते त्यानुसारच अर्जदार असलेल्या घनश्याम पुरोहित यांच्या झाड तोडण्याच्या अर्जानंतर नागपूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी एक जाहिरात प्रकाशित केली.
जाहिरातीमध्ये ज्या नागरिकांना ही झाड तोडण्यास हरकत आहे त्यांनी सात दिवसाच्या आत वृक्ष अधिकारी तथा उद्यान अधीक्षक नागपूर महानगरपालिका यांना लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावा असा उल्लेख केला होता. या जाहिरात बघितल्यानंतर नागपुरातील सामाजिक संस्था, पर्यावरणवादी संघटना या वृक्षाच्या तोडी विरोधात एकवटल्या. नागपुरातील पर्यावरण विषयांमध्ये काम करणाऱ्या ग्रीन विजल फाउंडेशनने झाडासमोरच उभे राहून हे झाड तोडण्याला विरोध करत या वृक्षतोडीला आपला निषेध नोंदवला आहे.
200 वर्षांहून अधिक काळ जुनं असलेलं हे झाड तोडण्यासाठी 2017 मध्ये सुद्धा प्रयत्न झाले होते परंतु सामाजिक संघटनेच्या विरोधानंतर त्यावेळेस ते झाड तोडण्यात आलं नव्हतं. बांधकाम करण्यासाठी त्यावेळी सुद्धा जागा मालकाने झाड कापण्यासाठी अर्ज केलेला होता.

पर्यावरणवाद्यांच्या मते हे झाड जसे आहे तसे ठेवूनच या ठिकाणी निर्माणकार्य करण्यात यावे परंतु वृक्षतोड करू नये.. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा हे 208 वर्ष प्राचीन पिंपळाचे झाड वाचविण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]