नागपूर | कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona Virus New Varient) जगभरातील देशांची धास्ती वाढली आहे. ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटचा वाढता धोका बघता राज्य प्रशासनही सतर्क झालेलं पाहायला मिळत आहे.
यातच नागपूर जिल्हा प्रशासनाने ओमिक्रॉन विरोधात कठोर पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.
परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहिर केली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या अटींचं पालन केलं तरच आता नागपूरात एंट्री मिळणार आहे. आता नागपूर जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर संपूर्ण लसीकरण असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिवाय, सर्व मॉल,बाजारपेठा, कोणतेही कार्यक्रम, कोणत्याही आस्थापनावरील भेटी किंवा सार्वजनिक प्रवासी यंत्रणांचा वापर या सर्वांसाठी देखील संपूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. तर तिकीट असणाऱ्या किंवा नसणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात संपूर्ण लसीकरणाशिवाय प्रवेश नाही. (No Vaccination,No Entry In Nagpur)
चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 50 टक्के आसनक्षमतेने सुरू राहाणार आहेत. कोणत्याही कार्यक्रमात उपस्थितांची संख्या 1 हजारांच्या वर जाणार असेल तर त्याची पूर्वसूचना प्रशानसाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोना रूग्णांना सक्तिचे विलगीकरण करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केले तर 500 ते 10 हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. (New Guidelines)
