जमीनदोस्त घराला येत आहे 30 हजाऱ्यांचे विजेची बिल…
बत्ती गुल मिटर चालू” हा चित्रपट तूम्ही पाहिला असालच!!! अशी काहीशी परिस्थिती भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत असून महापुरात घरे जमीनोंदोस्त झाली मात्र महावितरनाच्या भोंगळ करभरामुळे अजुन ही ह्या जमिनिदोस्त घराचे विजेचे बिल येत आहे।काय आहे नेमका प्रकार पाहूया विशेष बातमी…
मागील वर्षी अगस्त महिन्यात भंडारा जिल्ह्यात महापूर आला होता।या महापुरात वैनगंगा नदी काठावर वसलेल्या पिपरी गाव पुर्णतः पुराच्या पाण्यात वाहून गेले।त्या घरात लागलेली इलेक्ट्रिक मिटर सुध्दा पुराच्या पाण्यात वाहून गेली होती। पिपरी हे गाव गोसेखुर्द धरणात पुनर्वसित झाले आहे।पिपरी गावाला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले, मात्र काही गावकऱ्यांनी गाव सोडले नाही। त्यात मागील वर्षी आलेल्या महापुरात संपूर्ण गाव पुराच्या पाण्यात वाहून गेले होते।मग काय गावकऱ्यांनी पर्याय नाही म्हणून पुनर्वसित ठिकाणी गावकऱ्यांनी घरे बांधली।पण वर्ष लोटूनही या लोकांना विद्युत विभाग घरगुती विजेचे बिल पाठवत आहे।ज्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली आहे,
घर जमीनदोस्त झाले असा घरांना विजेचे बिल येत असल्याच्या प्रकार घडत आहे।यात विशेष बाब अशी की नवीन पुनवसित ठिकाणी घरे तयार झाले असल्याने लोकांनी इलेक्ट्रिक मिटरची मागणी केली,पण त्यांना आधीचे पडक्या घराचे बिल भरा नंतर नवीन मिटर देऊ असे महावितरण तर्फे सांगण्यात येत आहे।याची वारंवार तक्रार महावितरणला देऊनही लोकांना 30 हजारच्या वर बिल येत असल्याने वापरच नाही मग बिल कसं भरणार असे नागरिकांचे म्हणणं आहे।त्यामुळे महवितरणाच अजब कारभार व कामगिरी दमदार असे म्हणायची वेळ आली आहे।
