घरगुती समारंभ आटपुन घरी परतत असलेल्या स्कूटी चालकाच्या ओवरटेक करण्याऱ्या वेगेनार सोबत झालेल्या आमरासमोर धड़केत मृत्यु झाल्याची घटना मध्यरात्रीच्या भंडारा शहराच्या कारधा वैनगंगा मोठा पुलावर घडली आहे।ह्यात स्कूटी चालकाचा उपचारा दरम्यान भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यु झाला आहे।फैजान शेख वय 21 वर्ष राहनार मेंढा भंडारा असे
मृतक मुलाचे नाव आहे।तो कारधा येथे घरगुती समारंभ आटपुन आपल्या स्कूटी ने घरि जात होता।दरम्यान नागपुर वरुण भरधाव येणाऱ्या वेगेनार गाड़ी ओवर टेक च्या नादात फैजान च्या स्कूटी ला आमरा समोर धड़क दिली।धड़क इतकी जबर होती कि ह्यात फैजान गंभीर जखमी होऊन त्याची स्कूटी चेंदामेदा झाली।लागलीच लोकांनी त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याच्या पहाटे मृत्यु झाला आहे।ह्या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी वेगेनार चालक विरोधात गुन्हा नोंद केला आहे।
