80 लाखांच्या मुद्देमाल जप्त…
अन वाळू माफियाना हुलकावनी देण्यासाठी चक्क तहसिलदार आले बरमुड्यावर(हाफ पैंट)… वाळू माफियांच्या नेटवर्क ला हुलकावली देत छोट्या टेम्पो गाड़ीमध्ये बसून आलेल्या मोहाड़ी तहसीलदारानी वाळू तस्करी करण्याऱ्या 5 टिप्पर ट्रक आज पहाटे च्या सुमारास जप्त केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातिल रोहा-बेटाला घाटाजवळ घडली आहे।ह्या कारवाई तब्बल 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।ह्यात विशेष बाब अशी की आपल्याला तस्करी करणारे ओळखु नये म्हणून चक्क बरमूडा व टी शर्ट घालून त्यांनी ही कारवाई केलि आहे।
भंडारा जिल्ह्याच्या वाळू ला पूर्व विदर्भात प्रचंड मागणी असून वाळू तस्कराची नजर नेहमी नजर येथील वाळू वर असून प्रशासनाला हुलकवनी देत तस्करी जोमात सुरु आहे।अशीच वाळू तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती मोहाड़ी तहसीलदार दीपक करांडे यांना मिळाली।लागलीच एक टीम तयार करत स्वता कारवाई करण्याचे ठरविले
मात्र,वाळू माफियांचे नेटवर्क ही तितकेच तोडिचे असल्याने त्यांना हुलकावनी देण्याची योजना तयार करत एका छोट्या टेम्पो गाडित स्वता तहसीलदार बसून संबधित घटना स्थळ गाठत वाळू तस्करी करत असलेले 5 टिप्पर ट्रक जप्त केले असून त्यांना मोहाड़ी पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहे।ह्या कारवाई 80 लाख रूपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।मोहाड़ी तहसीलदारांच्या ह्या धड़क कारवाई ने वाळू माफियांचे दाबे दनानले आहे।
