Crime 24 Tass

पिंपळगाव कोहली येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी…

लाखोचा ऐवज लंपास…उपसरपंचाच्या धाडसाने एक चोर पोलिसांच्या स्वाधीन…तीन फरार…

उपसरपंचाच्या घरि चोरी ला गेला व फसला!! भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तहसील मधील पिंपळगाव कोहली येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे। दरम्यान,पिंपळगाव कोहली येथील उपसरपंच गोपाल परशुरामकर व सहकार्यांच्या धाडसाने चोरांचा पाठलाग केल्यावर एकाला पकडण्यास यश आले असून त्यास लाखांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अन्य तीन चोर फरार झाले आहे।

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे चार अज्ञात चोरांनी सर्वप्रथम ईश्वर मडकाम यांच्या घरचा मागील दाराच्या विटा काढून घरात प्रवेश केला,घरातून आठ सोन्याचे मनी चोरले।त्यानंतर चोरांनी खेमराज गहाणे यांच्या घराचा स्वयंपाक घराकडील मागील दरवाजाची कडी काढून आतमध्ये प्रवेश केला,घरात फिरून संपुर्ण माहिती व परिस्थिती जाणून घेतल्यावर घरातील एकूण सदस्य लक्षात घेता ते बाजूच्याच खेमराजचे बंधू गोवर्धन गहाणे यांच्या घराच्या मागील दरवाजाच्या कुलूप फोडून आतमध्ये प्रवेश केला,घरातील प्रत्येक खोल्यामधील साहित्याची नासधूस केली।बेडरूम मधील आलमारीमधून संपुर्ण अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच जवळपास 20 हजार रुपये लंपास केलेयावेळी कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना 

ही चोरी करण्यात आली।यानंतर पिंपळगाव कोहली येथील उपसरपंच गोपालपाटील परशुरामकर यांच्या घरी चोरी करण्याच्या बेतात घराचा मागील दरवाजा तोडताना आवाज झाल्याने प्रथम गोपाल परशुरामकर यांच्या पत्नीला जाग आली,त्यांनी वेळीच उठून पाहिले असता चार लोक दिसल्याने पतीला आवाज दिला।तात्काळ उपसरपंच गोपाल परशुरामकर यांनी घराच्या मागे जावून बघितले असता चार चोर घरामागून पळताना दिसले।त्यांनी दिनेश परशुरामकर व देवाजी परशुरामकर यांच्यासोबत एक किलोमीटर पर्यंत पाठलाग केला,यावेळी चार चोरापैकी दोन दोन च्या गटाने पळत असताना एक चोर पळताना जमिनीवर पडला,याच दरम्यान शिताफीने उपसरपंच गोपाल परशुरामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका चोरास पकडून चांगलेच चौपले।

यावेळी सदर चोराकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यास पकडण्यास अखेर यश आला।यावेळी आरडाओरड झाल्याने गावातील अनेक लोकं घटनास्थळावर उपस्थित झाले होते,घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचत या दरम्यान उपसरपंच गोपाल परशुरामकर यांच्या धाडसाने पकडण्यात आलेल्या चोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे।उपसरपंच गोपाल पाटील परशुरामकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे।सद्धा त्या आरोपी च्या डोक्यावर मार लागल्याने त्यास सध्या पोलिसांनी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत।

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]