तेलासाठी लोकांनी केली एकच गर्दी…
रायपूर कडून औरंगाबाद कडे जाणारा कच्चा तेल वाहून नेणाऱ्या टँकरला गोंदिया जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सह 6 वर सौंदड पासून दोन किलोमीटर अंतरावरील चुलबंद नदी लगत पूला जवळ अपघात होऊन, स्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली आहे।ह्यावेळी टँकरमधून रस्त्याच्या कडेला व नदीत वाहणारा तेल नेण्यासाठी परिसरातील गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसून आले।त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती।घटनेची माहिती होताच घटनास्थळावर डुग्गीपार पोलीस दाखल होत लोकांना पांगवुन रस्ता सुरळीत झाला आहे।
टँकर (क्रमांक सीजी 08 ए,एम 2347) छत्तीसगड राज्यातील रायपूर वरून कच्चा तेल घेऊन रिफाइंड करण्यासाठी औरंगाबादला जात होता।सौंदड पासून दोन किलोमीटर अंतरावरील चुलबंद नदीच्या पुलाजवळ टँकरला अपघात झाला,ही माहिती वाऱ्यासारखी सौंदड, फुटाळा व परिसरात पसरली। रस्त्याच्या कडेवरुन नदीत सदर तेल वाहत असल्याने, लोकांनी ते घेण्यासाठी महिला पुरुषांसह घटनास्थळी बहुसंख्येने गर्दी केली। ज्याला जेवढे मिळेल तेवढे तेल घेण्यासाठी जणू लोकांची स्पर्धाच लागली होती।ह्यावेळी पोलिस घटनास्थळ पोहचत ,वाहतूक पोलीस व डुग्गीपार पोलीस वाहतूक नियंत्रण केली।विशेष म्हणजे ह्या अपघातात कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही।
