अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर (Chandrapur) : तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा पिंपळनेरी-खापरी मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेजण यामध्ये गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारला सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५, रा. खापरी), कमल चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व मोतीराम मेश्राम (वय ७०, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत.
जिल्ह्यातील खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सूटले. त्यामुळे वाहन उलटले. या भिषण अपघातात सायत्रा मोतीराम मेश्राम, कमल चूनारकर या मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेले वडिल मोतीराम मेश्राम यांना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अधिक माहितीनुसार, उत्तम चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपुरात रेफर करण्यात आले. या घटनेने खापरी गावात शोककळा पसरली आहे.पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.
