गोसिखुर्द धरनाची पानी साठवन क्षमता वाढविन्याने शेती नंतर आता लोकांच्या घरा प्रयत्न आले पाणी (बैक वॉटर)…
गोसिखुर्द धरणाने आला भंडारा जिल्ह्यात कुत्रिम महापुर!! ऐकून धक्का बसला ना पण हे काही अशी खरे आहे।गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ करण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा मोठा फटका बसला होता की क़ाय आता चक्क लोकांच्या घरात ही पाणी घुसल्याने महापुराची स्थिति सद्धा पहायला मिळत आहे।ही स्थिति दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी नसून चक्क भंडारा शहरा लगत असल्याने आता हा विषय चिंतेचा विषय ठरत आहे।
जल संपदा विभागाने दिलेल्या सूचने नुसार गोसेखुर्द धरण प्रशासनाने आपल्या पाणी पातळीत वाढ करण्यात सुरुवात केली आहे।त्यांमुळे अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात सुध्दा बॅकवॉटर शिरले होते,मात्र आता हे पाणी लोकांच्या घरा जवळ पोहचले आहे।भंडारा शहरात ग्रामसेवक कॉलनी तर भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर कड़े ही पहायला मिळत आहे।
सुरुवातीला गोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर साहुली, पिपरी, चिचोली, खैरी, दवडीपार, निमगाव या गावापर्यंत आले होते आता तर चक्क शहरातील ग्रामसेवक कॉलनी पानी आले आहे।ह्या ठिकाणी केवल 58 पैकी 32 घरांचे पुर्नवासन झाले असून 26 घरांचे पुर्नवासन बाकी आहे।त्यांमुळे गत वर्षी आलेला महापुर शहरवासिय अनुभवत आहे।
गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा संपूर्ण वापर करता यावा म्हणून नोव्हेबरच्या सुरुवातीच्या दिवसापासून गोसिखुर्द धरण 100 टक्के भरून ठेवण्यात येत आहे।तसा आदेशच जलसंपदा विभागाने दिला आहे।त्यांमुळे गोसिखुर्द धरणाची पानी पातळी 245-246 मिटर पर्यत्न नेन्यात येणार आहे।सद्घा धरणाची पानी पातळी 244.800 मिटर असून 199.600 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे।मागील वर्षी 244.500 मिटर पाण्याची पातळी असतांना 190.600 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली होती।
त्यामुले मागील वर्षिच्या तुलनेत केवळ 10 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली असल्याच्या दावा गोसिखुर्द प्रशासनाने केला आहे।याशिवाय गोसिखुर्द धरनाने 223 स्वेअर हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असल्याचे ही सांगण्यात येत आहे।एकटया भंडारा जिल्ह्याच्या विचार करता 34 पूर्ण गाव 11 अंश बाधित गाव व 70 गावातील शेतजमीन अधिग्रहित केली आहे।त्यामुळे जर गोसिखुर्द धरणाचे बैक वाटर आले तर केवल 81 गाव जे सुरुवातीला अधिग्रहित करण्यात आले त्यातच पाणी जाणार पानी आले
असल्याचे सांगण्यात येत आहे।एकंदरित जिल्ह्यातील गोसिखुर्द धरण सींचनासाठी महत्वपूर्ण मानले जात असतांना केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह रहवासी त्रस्त ठरत आहे।
