कर्जबाजारी व नापिकी ला कंटाळून अल्पभुधारक शेतकऱ्याने स्वता:च्या शेतात गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आसोला गावात घडली आहे। सुधाकर नान्हे वय 60 वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे।
सुधाकर अल्पभूधारक असून आसोला गावात त्यांची एक एकड धान पिकाची शेती आहे।त्यांनी ह्यवर्षी स्वताच्या व भाडयाने घेतलेल्या शेतात धान पिकाची लागवड़ हातउसने व कर्ज काढून केली।मात्र हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे ह्या चिंतेत सुधाकर होते।मात्र अखेर कर्जबाजारी व नापिकी ला कंटाळून त्यांनी आज पहाटे शेत गाठत झाडाला गळफांस आपली जीवनयात्रा संपविली आहे।सकाळी इतर शेतकरी शेतात जात असतांना त्यांना सुधाकर ह्यांच्या मृतदेह गळफांस घेतलेल्या अवस्थेत दिसला आहे।
लागलीच हि बातमी वाऱ्यासारखी पसरून गावाकऱ्यांनी एकच गर्दी घटनास्थळी केली।ह्याची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शव विच्छेदनाकरिता पाठविन्यात आला आहे।मृतक सुधाकर ह्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगा,सुन व दोन नातवंड असा आप्त परिवार आहे।एकीकडे जिल्ह्यात निवडणुकीच्या धूमाकुळ सुरू असतांना सुधाकर ह्यांच्या मृत्यु व्यस्थित करणारा आहे।
