ट्रकचे डिझेल संपल्यामुळे वाहन मधोमध थांबवल्याने लागले मोठे ट्रैफिक…
भंडारा शहरातिल वैनगंगा नदी पुलावर घटना…
दोन तास ट्रैफिक जैम झाल्याने वाहनाच्या लागल्या रांगा…
हम जहाँ खड़े होते है वही से लाइन शुरू होती है.. हा अभिनेता अमिताभ बच्चन ह्यांच्या डायलॉग खुप गाजला असून त्याची आज आठवण भंडारा शहर वासियांना झाली आहे।साकोली कडून नागपुर कड़े जाणाऱ्या एका अवजड ट्रक चे डिझेल संपल्याने तो मधोमध बंद पडल्याने
चक्क 10 किलोमीटर पर्यत्न वाहनाच्या रांगा लागल्या ची घटना भंडारा शहरातून जाणाऱ्या महामार्ग 6 वर वैनगंगा नदी पुलावर घडली आहे।वेळीच भंडारा शहर पोलिस व ट्रैफिक पोलिसांच्या मदतीने त्या ट्रक ला डिझेल पुरविल्याने 2 तासानन्तर त्या ट्रक ला हटवत ट्रैफिक क्लियर करण्यात आले आहे।विशेष म्हणजे
भंडारा जिल्हा प्रशासनाने कारधा नदिवरिल छोटा पुल दुचाकी साठी ही बंद केल्याने दुचाकी चालक ही मोठ्या पुलांचा वापर करीत असल्याने आधीच पुलावरिल वरदळ गर्दीची झाली असतांना एखाद्या वाहनाचे रस्त्याच्या मधोमध बंद पड़ने खुप त्रास दायक ठरणार आहे।
