भंडारा शहरातील मध्यरात्रिची घटना…
जुन्या वैमनस्यातुन दोन गटात झालेल्या वादात एकाची चाक़ूने वार करत निर्घ्रुण हत्या केल्याची घटना भंडारा शहरात डॉ आंबेडकर वार्ड मध्ये मध्यरात्रिच्या सुमारास घडली आहे।मैदु पाटिल असे मृतकाचे नाव आहे।तर उमेश सोनकुसरे वय 20 वर्ष असे आरोपीचे असून त्याला अटक करण्यात आली आहे।तर त्याच्या फरार साथीदाराचा भंडारा शहर पोलिस शोध घेत आहे।
काल रात्रि डॉ.आंबेकडर वॉर्डात नगर परिषदेच्या हॉल मध्ये नियोजित लग्न सभारंभ येथील आरोपी व मृतक हे त्याच्या मित्रा सोबत लग्ना मध्ये सहभाग होण्या करीता आले होते।ह्यात एकमेकांना बघताच दोन्ही गटात वाद निर्माण झाला।
झालेल्या हानामारित आरोपी उमेश सोनकुसरे यांने मृतक मैदू पाटील ह्या च्यावर धारदार हत्याराने मृतकाच्या छातीवर वार केल्याने मृतक मैदू पाटील याचे जागेवरच मृत्यु झाला। हत्या नंतर सर्व आरोपी फरार झाले होते।मात्र पोलिसांना माहिती मिळताच आरोपीं उमेश सोनकुसरे ला अटक करण्यात आली असून फरार आरोपीच्या शोध भंडारा शहर पोलिस घेत आहे।
