अद्याप ही घेतली नाही लस….शिस्तभंगाची कारवाई होणार???…
807 शासकीय व निमशासकीय कर्मचारी ठरणार सुपर स्प्रेडर!! दिव्याखाली अंधार!! कोरोना लसिचे लसिकरन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम ह्यांच्या आदेशाला जिल्ह्यातील विविध विभागातील 807 शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली असून ह्या 807 कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाचे लसिकरन करून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।
त्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या 100 टक्के लसिकरणाचे उद्दीष्ठ पूर्तिसाठी त्यांचे कर्मचारीच रोडा टाकत असल्याचे स्पष्ठ झाले असून दिव्या खाली अंधार म्हणन्याची वेळ आता आली असून अश्या 807 बहाद्दर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग भंगाची कारवाई होणार असल्याचे सूत्रानुसार सांगण्यात येत आहे।
लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे। नुकतेच भंडारा जिल्ह्याने राज्यात लसीकरणात आघाडी घेतली मात्र शंभर टक्के लसीकरणाचे उद्देश्य गाठन्यात प्रशासनाला अड़चन येत आहे।हिच बाब लक्षात घेता, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कडक पाऊले उचलन्यात सुरुवात करत अद्याप एकही डोस न घेतलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात मनाई करण्यात आली आहे।
तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढण्यात येऊ नये, असे लेखी निर्देशही जारी करण्यात आले आहेत।30 नोव्हेंबर पूर्वी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यावेळी दिले।त्यावेळी जिल्ह्यात 2154 शासकीय व निमशासकिय कर्मचाऱ्यांनी कोरोना लसिकरन केल्याची स्पष्ठ झाले होते।मात्र ह्या आदेशाला अनेक कर्मचाऱ्यांनी गांभीर्यने घेत आपले लसिकरन करून घेरले असले तरि अद्याप 807 कर्मचाऱ्यांनी लसिकरनाला पाठ फ़िरविली आहे।
जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 95.50 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 65 टक्के आहे।तर जिल्ह्यात आता पर्यत्न 60 हजार 107 रुग्ण आढळले असून 58 हजार 973 कोरोना मुक्त झाले आहे तर 1133 रुग्णाच्या बळी गेला आहे।जिल्ह्यात ही बळी संख्येची विदारकता लक्षात घेता एडवांस सरण रचन्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती।तरि स्वता प्रशासनातील लोक ह्याला गंभीर्याने घेत नसल्याचे सामोर येत आहे।त्यांमुळे लसिकरन न घेतले कर्मचारी कोरोना विषाणु चे सुपर स्प्रेडर ठरणार आहे।
