धडकेत दुचाकीस्वार महिलेचा करुण मृत्यू
भंडारा शहरालगत असलेल्या कारधा पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय महामार्ग वर आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका कंटेनर ने दुचाकी स्वार महिलेला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेत मृत महिलेचे नाव रेखा नागोरी वय वर्ष 55 सांगितले जात आहे. दुचाकीस्वार महिला रेखा नागोरी ही शिक्षिका असून भंडारा कडून इटगाव येथे शाळेत जात असताना हा अपघात घडला.
गोसे धरणाचे बॅकवॉटर मुळे कारधा येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यामुळे ये-जा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवर असलेला मोठा पुलावरून दुचाकीस्वारांची आवागमन वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज भासत आहे.
