गोंदिया जिल्हाच्या सालेकसा तालुक्यातील एका 55 वर्षीय रुग्णाचा तर भंडारा शहरातील एका 80 वर्षीय वृद्धाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून गोंदिया जिल्हात सध्या 3 कोरोना बाधित एक्टिव रुग्णानावर उपचार सुरु आहेत।भंडारा जिल्हात 2 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे।
देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरताच नव्याने पुढे आलेल्या ओमायक्रॉन विषाणूचे चे रुग्ण सापडत असताना विदेसातून प्रवास करून आलेल्या किंवा बाहेर राज्यातून आलेल्या लोकांवर प्रशासनाची नजर असली तरी गोंदिया जिल्हात कोरोना मुळे एका 55 वर्षीय वृद्धाचा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना शुक्रवारला मृत्यू झाला असून गोंदिया जिल्हात आता पर्यंत 41 हजार 239 लोकांना कोरोनाची लागण झाली असून आता पर्यंत 577 मृत्यू झाला आहे।तर भंडारा जिल्हात आता पर्यंत 60 हजार 109 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 1134 लोकांनाच मृत्यू झाला आहे।त्यामुळे दोन्ही जिल्हातील नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आव्हान जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे।
