लोकांनी वाचला समस्याच्या पाढ़ा…वीडियो वायरल…मतदार झाले जागरूक...
*नेत्यांनो आणि उमेदवारांनो इथे लक्ष असु द्य्या???* आपन मागील कार्यकाळात विकास कामे केली नसाल तरी स्वता साठी किंव्हा आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी मत मागायला जात असाल!! तर जपुन..!!तुम्हाला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो?? होय,,आता भंडारा जिल्ह्यातील मतदार जागरूक झाला असून तुमच्या कार्यकाळात तुम्ही विकास कामे न केल्याने तुम्हच्या उमेदवाराच्या मत मागायला जाने चांगलेच महागात पड़ले असून लोकांचा रोषाचा सामना करावा लागल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातील वरठी येथील नेहरू वार्ड मध्ये घडली आहे।
येथील लोकांना रस्ते,पाणी, आणि नाल्या ह्या मूलभूत सुविधा अद्याप ही ग्रामपंचायती मार्फत न पुरविल्याने गेल्याने चक्क ह्या वार्डतिल लोकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी वर बहिष्कार टाकला असता,मत मागायला गेल्याने उमेदवारच्या येथील स्थानिक़ लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे।लोकांनी घेराव करत चक्क वार्डतिल समस्येचा पाढ़ा वाचत मागिल कित्येक वर्षा पासुन खराब रस्त्याच्या नाईलाजाने करावा लागत असलेला वापर,तसेच अद्याप ही सांडपाण्याची व्यवस्था केली नसल्याच्या संताप व्यक्त केला आहे।
तर पिण्याचे पाणी वेळेत न मिळत असल्याचे अधोरेखित करंत उमेदवाराला लोकांनी खरीखोटी सुनावाली।उमेदवाराची फजीती बघता असता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धावून आले खरे मात्र त्यांना देखील लोकांच्या संतापाला सामोर जावे लागले आहे।अखेर पोलिसांना पाचारन करत मध्यस्ति ने प्रकरण मिटवत,झळकलेले बहिष्काराचे पोस्टर काढन्यात आले आहे।ह्या संपूर्ण प्रकरणाच्या वीडियो सद्धा वायरल झाला असून मतदार जागरूक झाल्याची चर्चा सद्धा जिल्ह्यात सुरु आहे।
