भंडारा शहरातील नेहरू वार्ड येथील घटना
भंडारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका संशयीत पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दि .२१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता दरम्यान नेहरू वार्ड, मेंढा येथे उघडकीस आला. नेहरु वार्डातील बक्षीता हिचा पांढराबोडी येथील विलास मेश्राम याच्या सोबत विवाह झाला होता. लग्ना च्या काही वर्षा नंतर च विलास हा पत्नी बक्षीता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला त्यामुळे पती-पत्नीत यांच्यात सतत भांडण होऊ लागले ज्याला कंटाळून व पती विलास याच्या त्रासामुळे मागील एक-दीड वर्षापासून बक्षीता ही आपल्या दोन मुलांसह माहेरी नेहरु वार्डा मध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती. दिनांक २० डिसेंबर रोजी पती विलास हा बक्षीता कडे राहायला आला. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला यातच पती विलास याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. व सामोरील तपास सहाय्यक पोलीस नरीक्षक केदार हे करीत आहेत…
