भंडारा न्यूज़
एकोडी – बीड शेतशिवारातिल घटना.
एका 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्या ची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी – बीड शेतशिवारात घडली आहे।पल्लवी विष्णू बोरकर असे मृतक मुलीचे नाव आहे।
एकोडी – बीड शेतशिवारात एका 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत दुपारच्या सुमारास उघडकीला आला आहे।घटनेची माहिती साकोली पोलीसाना देण्यात आली असून पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत मुलीच्या मृतदेह खाली उतरविला आहे।
मुलीने प्रेम प्रकरनातून गळफ़ास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे।
