भंडारा सामान्य रुग्णालयातील घटना…भंडारा शहर पोलिस आरोपी महिलेच्या शोधात…
घरफोडी ची आरोपी महिला तिच्या वैद्यकीय चाचणी दरम्यान पोलिसांना हाताला तुरी देऊन भंडारा सामान्य रुग्णालयातिल अतितात्काळ सेवा वॉर्डच्या शौचालयाच्या खिड़कीची जाळी तोडून पसार झाली असून भंडारा शहर पोलिस आरोपी महिलेच्या शोधात लागली आहे।
भंडारा शहरातील तकिया वार्ड मधील सुनील बांते ह्यांच्या घरि चोरी दरम्यान संबधित आरोपीं महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते।फिर्यादी सुनील बांते यांच्या तक्रारी वरुन सोलापुर निवासी आरोपी महिलेवर भंडारा शहर पोलिसात 380 ,511 नुसार गुन्हा नोंद करत तिच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करत तिच्या वैद्यकीय चाचणी साठी तिला भंडारा सामान्य रुग्णालयात नेन्यात आले।
दरम्यान आरोपी महिलेला सामान्य रुग्णालयाच्यां वार्ड क्रमांक 9 मध्ये अतितात्काळ सेवा नेन्यात आले।ह्यावेळी महिला पोलिस नाइक अर्चना गनवीर ह्यावेळी आरोपी महिला घेऊन आले होते।दरम्यान आरोपी महिलेने लघुशंकेच्या बहाना करत वार्ड मधील शौचालय वापर करण्याची परवानगी संबधित महिला पोलिसांना मागितली,महिला पोलिस नाइक त्या महिलेला शौचालय कड़े घेऊन स्वता शौचालय बाहेर उभे राहाली असता शौचालयाच्यां नळ सुरु ठेवत खिड़कीला लागलेली जाळी तोडून संबधित आरोपी महिला पसार झाली आहे।
बराच वेळ झाला तरि आरोपी महिला शौचालय बाहेर न आल्याने संबधित प्रकार उघडिस आला आहे।ह्या प्रकरणी महिला पोलीसांच्या तक्रारी वरुन भंडारा शहर पोलिसात 244 कलम सुद्धा लावण्यात आला आहे।भंडारा शहर पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत आहे।
