भंडारा, दि. 28 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वैद्यकीय जगताने वर्तवलेले असून तिसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उद्योगसमूहांना आवाहन केले होते, की त्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजे सीएसआर फंडामधून नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हाकेला प्रतिसाद देत भंडारा जिल्ह्यातील उद्योगसमूहांनी सीएसआर अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करीता निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये सनफ्लॅग मार्फत रु. 1.50 लक्ष, एम. एम. कंपनी शहापूर यांचेमार्फत रु. 1.50 लक्ष व क्लेरीयन कंपनी तुमसर यांचे कडून रु. 1.50 लक्ष प्राप्त झाले.
