कुमार पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील घटना
ट्रॅक्टर ट्रालीच्या चाकाखाली येवून विद्यार्थी ठार
लाखनी
ऊसाची वाहतूक करणार्या चालत्या ट्रॅक्टर मधून उस काढत असताना तोल गेल्याने ट्रॅक्टर ट्राली च्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ( ता. २८) दुपारी २ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुमार पेट्रोल पंपासमोर घडली. ईश्वर टीकाराम मेश्राम (वय १२ ) रा. सावरी / मुरमाडी असे अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जि. प. गांधी विद्यालयातील इयत्ता ७ व्या वर्गात शिकत होता.
सध्या उस तोडणीचा हंगाम सुरू असून तालुक्यातील उस बाबदेव (मौदा) येथील साखर कारखान्यात पुरवठा केला जातो त्यामुळे ट्रॅक्टर च्या २ ट्रालीच्या सहाय्याने वाहतूक केली जाते. शहरातील जि. प. गांधी विद्यालयदुपार पाळीत सुरू असल्याने . दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शाळेची मध्यान्ह भोजनाची सुट्टी झाल्याने विद्यार्थी बाहेर होते. शाळा महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याने केली जाणारी वाहतूक दिसत असते. तसेच सध्या शेतातील उस निघल्याने त्या ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
उस खाण्याचा मोह ईश्वर ला झाल्याने चालत्या ट्रॅक्टरच्या ट्राली मधून उस खिचून काढत असताना तोल गेल्याने तो खाली पडून ट्रालीच्या चाकात आला. त्यात त्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती घटना स्थाळावर पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच पोलिस चमू घटना स्थळी पोहचली.
वाहतूक पोलिस नायक लोकेश ढोक यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह उचलून उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. विद्यार्थ्याचा अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
