बेला येथील घटना : रोख रकमेसह ९७ हजारांचे साहित्य हिसकाविले
भंडारा दुकानात आलेल्या तीन अनोळखी इसमांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून दोघांना लुट घटना शहराजवळील बेला येथे घडली. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संकेत शशिकांत मेश्राम रा. बेला हा त्याच्या मावशीच्या मुलासोबत राष्ट्रीय महामार्गावरील साईप्रसाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या देवांशी ऑटोमोबाईल
दुकानात काम करीत होते. यावेळी किमतीची ३ ग्रॅम कानातील बाली, ए टी एम कार्ड, क्रेडिट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना आधार कार्ड, पॅन कार्ड, पॉकेटातील एक हजार, हेड फोन, असा ९६ हजार ७५० रुपयांचे साहित्य व रोख जबरीने हिसकावून पळून गेले.
३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी इसम एमएच ३१ १९५० या क्रमांकाच्या दुचाकीने दुकानात आले. त्यांनी दोघांच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर व थापडबुक्की मारून जखमी केले. यानंतर दुकानातील गल्ल्यातील रोख पाच हजार रुपये १५ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल ४४ हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल, २१ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ९ हजार रुपये
संकेत मेश्राम याच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जगणे करीत आहे.
