भंडारा जिल्हात अवकाळी पावसासह तुमसर- मोहाड़ी तालुक्यात झाली गारपीठ…
विज पड़ून एकाचा मृत्यु तर बैल ही दगावला..
भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेला अंदाज़ खरा ठरला असून काल भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे।तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर व मोहाड़ी तालुक्यात अनेक ग्रामीण भागात काल गारपीठ झाली असून ह्या गारपीठीने रब्बी पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे।
मोहाडी तालुक्यात उसरी, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कान्द्री तर तुमसर तालुक्यातिल पवनार व अनेक ग्रामीण भागात गारपीठ झाली आहे।ह्यात शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे।ह्या नुकसानी चे पंचनामे करून नुक्सान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे।
तर दूसरी कड़े भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसाळा नवेगाव शेतशिवारात झालेल्या मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसात सापडून आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेलेल्या नऊ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला।नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे।याचवेळी शेतात बांधलेल्या एक बैलही ठार झाला।त्यांमुळे काल आलेल्यां अवकाळी पावसासह गारपीठी ने जान-मालाचे नुकसान केले आहे।
