शासकीय जागेतील नहर भूमिगत करण्याची मागणी…
अभय भूते
नेरला उपसा सिंचन आंबाडी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कालव्याच्या खोदकामाने जेवनाळा येथील आरक्षित कुरन व मैदानातून खुल्या पद्धतीने सुरू केल्याने गावातील तरुण व पशुपालकांनी याचा विरोध करत काम थांबविला व भूमिगत बांधकामाची मागणी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यतिल जेवनाला वसियानी केली आहे।
ग्रामीण भागात प्रत्येक गावाची एक ओळख निर्माण झालेली असते।तशीच लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील गावा लगत असलेला कुरन व मैदान हे गावाला नैसर्गिकरीत्या लाभलेले एक वैशिष्ट्य आहे।मागील 40 वर्षांपासून गावातील तरुण या परिसरात पोलीस भरतीचा सराव करतात यातूनच अनेक तरुणांचे भविष्य उज्वल झाले आहे।
मात्र गोसे धरणाच्या कालव्यामुळे मैदानाचे व आरक्षित कुरणाचे विद्रुपीकरण होत आहे।हे तरुणांना पाहून न झाल्याने तरुणांनी व ग्रामवासियानी खोदकाम थांबविले आहे।कुरन क्षेत्रातून जाणारे नहर हे मैदान व कुरणाचे अस्तित्व मीटवणारे असून खुल्या नहरामुळे हे दोन भागात विभागले जाणार आहेत।व त्या ठिकाणी चराई साठी जाणारे जनावरे त्यात पडल्यास पशुपाकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। खुल्या नहरामुळे कुरणाचे क्षेत्र बाधित होणार आहे।
याचा फटका हा पशुपालकाना बसणार आहे।या करिता ग्रामपंचायत जेवनाळा कडून 2018 ला ठराव घेवून संबंधित विभागाला शासकीय जागेतील बांधकाम हे भूमिगत करावी अशी विनंती करण्यात आली होती। परंतु संबंधित विभागाकडून यात काही बदल होणार नसल्याचे कळविण्यात आले।त्यामुळे या ठिकाणी गुरे चारण्यासाठी नेणाऱ्या गुराख्याच्या चिंतेत भर पडली आहे।यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पुन्हा विभागाला भुअंतर्गत करण्याची विनंती करण्यात आली आहे।
