सरवर शेख
भंडारा न्यूज़
दिवाणी सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता…मात्र आज ची रात्र तुरुंगातच
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्यापारी मित्रांची 50 लाख रुपये व सोन्याचे दागिने पोलिसांची चोरले असल्याचा आरोप आमदारांनी केला असून 31 डिसेंबर च्या मध्यरात्री आमदारांनी मोहाडी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती। तो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलिसांनी आज आमदार यांना अटक केली होती।
त्यामुळे मोहाडी येथील दिवाणी न्यायालयात आमदार यांना हजर करण्यात आले होते।मात्र दिवाणी न्यायालयाने जामीन नामंजूर असून 15 जानेवारी पर्यंत एम सी आर कोठडीत रवानगी करण्यात आली होती,मात्र आमदारांच्या वकिलांनी तत्काळ भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जमीन करीता अर्ज केला असल्याने आता आमदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे।असे असले तरि आज ची रात्र आमदार राजु कारमोरे यांना तुरुंगात घालावी लागणार असून उद्या सकाळी मात्र त्यांना तुरुंगातुन सोडन्यात येणार आहे।
