Crime 24 Tass

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहरातील पोलीस मुख्यालयजवळ सोमवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.


धीरज हजारे (२३) रा. करचखेडा असे मृतकाचे नाव आहे. करचखेडा फाट्यावरील नाक्यावर मृतक आणि त्याच्या भावाचे चायनीज सेंटर आहे. कुठल्या तरी कामासाठी मृतक धीरज त्याची दुचाकी क्रमांक एमएच ३६ एसी ९०२० ने भंडारा शहराकडे येत होता. यावेळी पोलीस मुख्यालयाजवळ मागून आलेल्या एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. या भीषण अपघातात धीरजच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]