Crime 24 Tass

भीषण अपघातात दोन गंभीर जखमी

भंडारा : भरधाव आलेल्या ट्रकने चारचाकी वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात गाडी चक्काचूर झाली असून वाहनातील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना साकोली तालुक्यातील मुंडीपार दुहेरी मार्गावर सोमवारला रात्री ७.४० वाजताच्या सुमारास घडली.
जावेद अजीजभाई विद्यानी (६५), साहिल जावेद विद्यानी (४०) दोघेही रा. शिवाजी वार्ड साकोली हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. हे दोघेही एमएच ३१ बीबी ६०७५ या वाहनाने साकोली येथून भंडाराकडे निघाले होते. दरम्यान मुंडीपार दुहेरी मार्गावर भरधाव वाहनाने चारचाकी वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कार चक्काचूर झाली. अपघातानंतर अपघाताला कारणीभूत वाहन घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच गडेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार पांडे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी खासगी वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी साकोली पोलिसांनी अज्ञात वाहन विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]