Crime 24 Tass

Covid 19 : आरोग्यमंत्री टोपेंनी घेतली शरद पवारांची भेट

जिल्हांतर्गत बंदीबाबत स्पष्ट केली भूमिका, म्हणाले.

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कडक केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? असा प्रश्न सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.


या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

“वीकेण्ड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भात चर्चा झालेल्या आहेत परंतु, अद्याप निर्णय कुठेलेही झालेले नाहीत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात.

तसेच, मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा कुठला विषय सध्या नाही. जिल्हांतर्गत बंदी देखील तूर्त कुठलीही नाही.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.


आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, त्यांच्याशी राज्यातील करोना संसर्गाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. शरद पवार यांनी राज्यातील एकंदरीत परिस्थितीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा घेतला.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी सांगितले की, “शरद पवार यांचा रोज सगळ्यांची संपर्क असतो आणि त्यांना राज्यातील करोना संसर्गाची वाढत असलेली परिस्थिती आहे,

की सध्या साधारणपणे काल २५ हजाराच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. उद्या कदाचित ३५ हजारही असू शकतील.

ही जी आम्ही आकडेवारी सांगितली होती, त्याबाबत अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि माझ्यासोबत काही वेळ चर्चा केली.

ज्यामध्ये सध्याची परिस्थिती त्यावरील उपाय आणि काय निर्बंध आता सध्या निर्बंध जे आहेत त्याची अमलबजावणी होती आहे का?

नाही होत तर त्यालाय करावं लागेल? किंवा अमलबजावणी होत नसेल तर कडक कार्यवाही करा, हे देखी सांगितलं. अशा प्रकारे चर्चा करून त्यांनी एक आढावा घेतला.”

तसेच, “आपण मुंबई, पुणे, ठाणे यासह काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु, हा वर्ग अन्य ठिकाणी जर फिरत राहिला तर मग आपला उद्देश साध्य होणार नाही,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार हे देखील दररोज चर्चा करतात. रोज सकाळी सात वाजता त्यांची फोनवर एकमेकांशी सविस्तर चर्चा असते.

त्यामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी अधिकची माहिती घेतली. निर्बंधाबाबत जी काल उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज देखील काही चर्चा झाली.

या संदर्भातील योग्य निर्णय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करून घेतली व कळवतील. आम्ही देखील आमची मतं मांडली आहेत, त्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय़ घेतले जातील.” अशी माहिती टोपे यांनी दिली.

याचबरोबर, “प्रामुख्याने जी चर्चा झाली व ज्यावर एकमत झालं ते म्हणजे १०० टक्के लसीकरण प्रचंड वाढवलं पाहिजे. शरद पवार हे देखील म्हणाल की आम्ही देखील आमच्यावतीने जे काही जनतेला सांगायचं असेल, त्याची देखील माहिती घेतली. अद्याप बऱ्याच जणांनी लस घेतलेली नाही त्यांनी लस घेतलीच पाहिजे.

ज्यांची तारीख ओलांडल्या गेली आहे आणि दुसरा डोस घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेतला पाहिजे.” असे आवाहनही यावेळी टोपे यांनी केले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]