Crime 24 Tass

कनेरी दगडी येथील नाल्याच्या बंधाऱ्याच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लाखनी तालुक्यातील कनेरी दगडी येथील सौ.रुकमा उर्फ मळाबाई हिरामण मेश्राम (85)ही महिला डोक्यात फरक असल्याने दोन ते दिवसापासून घरून निघून गेली होती या महिलेची शोधा-शोध केली मात्र कुठे आढळून आली नाही.फिर्यादी भगवान हिरामण मेश्राम हे आपल्या घरी हजर असता हर्षल झलके राहणार कनेरी दगडी याने भगवान मेश्राम यांच्या मोबाईलवर दुपारच्या सुमारास फोन करून सांगितले की,सौ रुक्माई उर्फ मळाबाई हिरामण मेश्राम ह्या नाल्याच्या बंधाऱ्यातील पाण्यात पडून आहेत त्यावरून भगवान मेश्राम हे आपल्या नातेवाईकांसोबत जाऊन पाहणी केली असता तिथे रुकमा मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यावरून पोलीस पाटील यांनी लाखनी पोलिसांना सांगितले व गावच्या लोकांच्या सहकार्याने ते प्रेत नाल्याच्या बाहेर काढण्यात आले रुक्माबाई ही वयोवृद्ध असल्याने व तिच्या डोक्यात फरक असल्याने ती घरून निघून गेली होती.त्यामुळे बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला असावा असे फिर्यादीचा कोणावरही संशय नाही अश्या फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन लाखनी येथे मर्ग क्र.2/2022 नुसार कलम 174 जा.फौ.नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बागडे हे करीत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]