Crime 24 Tass

वाहतूक नियमाचे उल्लंघन प्रकरणी २.३३ कोटींची वसुली

४९ हजार चालान केसेस : महामार्ग पोलीस केंद्र गडेगावची कौतुकास्पद कारवाई

भंडारा : नियमाचे पालन न करता त्याचे उल्लंघन करून वाहन चालविणे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडाचे ठरले आहेत. गडेगाव महामार्ग पोलिस मदत केंद्राने वाहतुक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४९ हजार ४४० चालान केसेसमधून २ कोटी ३३ लाख ३० हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आली.


२०२० मध्ये महामार्गावरील प्राणांतिक अपघात संख्या ५३ असून सन २०२१ मध्ये ही ८ ने कमी होऊन ती संख्या ४५ झाली. अपघात प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांचे ठिकठिकाणी वाहतुक नियमनांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविने’ हे अपघाताचे कारण आहे. वाहन चालंकाविरुध्द मोठ्या प्रमाणात इंटरसेप्टर वाहनातील स्पिडगनद्वारे कारवाई करण्यात येत आहे.

अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतून माहे मार्च २०२१ पासून महामार्गावर घडणाऱ्या अपघातामध्ये जखमींना वेळेत उपचार मिळून जिवीतहाणी टळावी याकरीता ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजणा अमलात आलेली आहे. मार्गनिहाय विविध ठिकाणी ९४ हायवे मृत्युंजय दूतांची निवड करून त्यांना अपघातामधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षीत करून किट वाटप करण्यात आलेल्या आहेत. योजणे अंतर्गत निवड करण्यात आलेल्या नागरीकांचे सहकार्यानेच प्राणांतिक अपघामाध्ये मागिल वर्षाचे तुलनेत १५.०९ टक्के कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे. तसेच सुमारे १७० प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले असून अंदाजे ५ हजार लोकांना मार्गदर्शन केले आहे. ज्यामुळे अपघातांचे प्रमाणात घट होण्यास मदत झाली आहे.


सदरची कारवाई अपर पोलीस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, पोलीस उप अधीक्षक संजय पांडे, पोलीस निरीक्षक वैशाली वैरागडे यांचे मार्गदर्शनात महामार्ग पोलीस केंद्र, गडेगांव येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार पाण्डेय, पोलीस उपनिरीक्षक नितीन आगाशे, पोलीस हवालदार रूपंचंद पटले, पोलीस हवालदार सुनील खरवडे, पोलीस नायक नामदेव नखाते, शेखर देशकर, हुकूमचंद आगाशे, विनोद शिवणकर, संजय इश्वरकर, उमेश टेंभुर्णीकर, किशोर हटवार यांनी केली आहे.

निलंबनाकरिता प्रस्ताव सादर
महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव अंतर्गत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांनी सहकारी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासोबत प्रामुख्याने महामार्गावरील होणारे अपघात प्रमाण कमी करण्याचे उद्देशाने दैनंदिन कामकाजांची नियोजनबध्द आखणी करून मोटार वाहन कायदा अंतर्गत नियमनांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवर मोठया प्रमाणात कार्यवाही करून ३१.१२.२०१५ अन्वये प्राप्त शासन निर्णयाप्रमाणे विशेष नियमनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची अनुज्ञप्ती (वाहन चालविण्याचा परवाना) संबंधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे निलंबनाकरीता प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे.

नियमाने वाहन चावून जीवन सुरक्षित ठेवा
महामार्गावर नागरीक सुरक्षीत राहण्यासाठी वाहन चालकांनी मोटार वाहन कायद्या अंतर्गत सर्व वाहतुक नियमनांचे पालन करावे. मोटार सायकलस्वार यांनी वाहनाचे वेगावर नियंत्रण, हेल्मेट परिधान करणे, ट्रिपलसिट प्रवास टाळावा तसेच इतर वाहन चालकांनी प्रामुख्याने वाहनावर नियंत्रण ठेवून मर्यादीत वेगात वाहन चालविने व मद्यप्राशन (मादक पदार्थ) करून वाहन चालवू नये.
– भूषणकुमार उपाध्यक्ष,
अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक)

नियम पाळल्यास अपघात टळेल
अवैध प्रवाशी वाहतुक करू नये, वाहनातील पूर्ण सिट बेल्टचा वापर करावा, मालवाहू वाहनामध्ये प्रवाशांची वाहतुक करू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, मार्गावर ठरवून दिलेल्या लेन ने वाहन चालवावे आदी वाहतुक नियमनांचे पालन केल्यास अपघात प्रमाणांमध्ये निश्चितच घट होई.
– श्वेता खेडकर,
पोलीस अधीक्षक,
महामार्ग पोलिस प्रादेशिक विभाग, नागपूर

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]