भंडारा: हरी दाजीबा लंजे हे भंडारा जिल्ह्यातील मौजा दांडेगाव, पो. भागडी, ता. लाखांदूर येथील मुळचे रहिवासी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय चिचाळ बारव्हा, ता. लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे कायमस्वरूपी शिक्षक पदावर कार्यरत होते. काहिही कारण नसताना सुद्धा शाळा प्रशासनाने अचानक त्यांना शिक्षक पदावरून काढून त्यांच्या जागेवर व्यंकट लांजेवार हे जुन्या संस्थेचे नियुक्त व कार्यरत कर्मचारी नसतांना सुद्धा त्यांची बोगसरित्या शिक्षक म्हणून नियुक्ती केली.
आपल्यावर झालेला अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा म्हणून श्री हरी लंजे यांनी शासन दरबारी वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा केला. आपल्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यास आयुष्यातील २२ वर्षे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने आदेश दिले परंतु शिक्षण विभागाने न्यायालयाच्या आदेशालाही झुगारून लावले. अख्खे २२ वर्षे लोटूनही त्यांना
मिळू शकला नाही. हरी लंजे यांना मुळ वेतनासह सहाय्यक शिक्षक पदावर तात्काळ नियुक्त करण्यात यावे व पोलीस स्टेशन लाखांदूर जिल्हा भंडारा येथे दाखल अ.प. क्रमांक १०८ / १० या गंभीर गुण्ह्यातील आरोपींना व या दखलपात्र गुह्याचा बेकायदेशीरपणे एनसी फायनल आदेश करणारे तपास अधिकारी प्रथम श्रेणी दंडाधिकारी, पोलीस अभियोक्ता व पिठासीन अधिकारी यांना सदर गुण्ह्यात सहआरोपी करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्या कडून तीन करोड रुपये वेतनासह वसुली करण्यात यावी या मागणी करिता श्री हरी लंजे यांनी दि. १४ / १२ / २०२१ पासून आझाद मैदान मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
वर्षे लोटुनही त्यांना न्याय भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा समोर एक महिना आमरण उपोषण केले. त्यावेळी राज्य शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडु यांनी सदर प्रकरणात चौकशी व कारवाई करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते परंतु अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे श्री हरी लंजे यांनी आपल्या प्रयत्नाला हार न मानता न्यायाच्या प्रतीक्षेत लढा सुरुच ठेऊन आझाद मैदान मंत्रालयासमोर मुंबई येथे उपोषणाला सुरुवात केली. शरीरात प्राण असेपर्यंत श्री लंजे आपल्या न्याय हक्काकरीता लढा देतच राहणार.
