तीन वर्षांच्या चिमुकल्या समोर घडली दुर्दैवी घटना
संसार आणि कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडे लागणं आलच. पती-पत्नीत वाद हा काही नवीन विषय नाही. कुठल्या तरी कारणावरून दोघात वाद होतात. त्यानंतर त्यांकग्यात काही वेळेपूरता अबोला देखील राहतो. काही वेळाने कुठल्यातरी कारणावरून दोघात संधी होऊन ते झालागेल विसरून जातात आणि पुन्हा आपल्या संसारात रमतात. पण कारधा येथील पती -पत्नीत झालेल्या भांडणात त्या दोघांनी स्वतःला जाळून घेतले. महत्वाचे असे की ही दुर्दैवी घटना तीन वर्षांच्या चिमुकल्या समोर घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून तीन वर्षांचा चिमुकला आईवडिलांच्या मायेला मुकला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात महेंद्र सिंगाडे (38) हे आपल्या पत्नी मेघा सिंगाडे (30) सोबत राहत होते. त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की पती पत्नीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. घरात तीन वर्षांचा चिमुकला असताना त्याच्या समोरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. यानंतर दोघांनीही एकमेकांवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. सुदैवाने या घटनेत तीन वर्षांचा मुलगा बचावला आहे. या घटनेनंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.
तीन वर्षांचा चिमुकला झाला आई वडिलांच्या मायेला पोरका हा दुर्दैवी प्रकार मयत परी पत्नीच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या डोळ्यादेखत घडला आहे. अद्याप काय झाले याचे त्याला ज्ञान नाही. पण तो चिमुकला आई वडिलांच्या मायेला मुकला आहे.
